Monday, August 25

कितीही "प्रहार' झाले तरी मी अविचल!


""कितीही "प्रहार' झाले तरी मी अविचल आहे. शांतता आणि संयम हेच माझे धोरण आहे; तेच संस्कार माझ्यावर झाले आहेत. काही जण आक्रमक असतात, लोकांना ते आवडतेही; पण माझी पद्धत आयुर्वेदिक आहे "स्लो बट स्टेडी'...''
अशी जोरदार टोलेबाजी केलीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी "साम मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत.

मुरब्बी कॉंग्रेस नेत्याच्या प्रतिमेला जागत विलासराव देशमुख यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता टोलेबाजी केली. पक्षश्रेष्ठी आणि पक्षावर निष्ठा ठेवली की यश मिळते, अशा शब्दांत सूचक सल्लाही दिला. राजू परुळेकर यांनी घेतलेली ही मुलाखत "साम'वरून सोमवारी (ता. 25) रात्री साडेनऊला प्रक्षेपित होणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, ""पक्षश्रेष्ठी आणि पक्षावर मी कायम निष्ठा ठेवली. मिळेल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, मग ती संघटनेतील असो वा सरकारच्या नेतृत्वाची. सामान्यांबद्दल कणव ठेवली. आघाडी सरकारचे नेतृत्व करताना डोक्‍यावर बर्फाचा खडा आणि जिभेवर खडीसाखर हे सूत्र कायम ठेवले, हीच माझ्या यशाची गुरुकिल्ली आहे.''

ते म्हणाले, ""कॉंग्रेस लोकशाही मानणारा पक्ष आहे. कोणी काहीही म्हणत असले, तरी पक्षश्रेष्ठींचा विश्‍वास असेपर्यंत काळजी नाही. नेतृत्व अस्थिर असल्याची चर्चा वारंवार झाली तर जनतेवर आणि नोकरशाहीवर प्रतिकूल परिणाम होतो. आता अस्थिरतेच्या चर्चा पूर्ण थांबल्या आहेत. कॉंग्रेस टिकली तरच आपले भले होईल, हे पक्षातील इतर लोकही लक्षात घेतील.''

2 comments:

Ranj said...

महाराष्ट्राचे दुर्देव

जनतेच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याला संयमाचे नाव द्यायचे. दिल्ली दरबारी मात्र दोन दोन दिवस वाट पाहायची यांची तयारी आहे. विकासाच्या नावावर राज्य बकाल करण्याचे कारस्थान चालू आहे. महाराष्ट्राच्या बाजुने कणखर पणे बोलण्याची ताकद कधीही दाखवलि नाही. विकासाच्या नावावर शेतकऱ्यांकडून जमिनी कवडीमोल भावाने घ्यायच्या. परप्रातीयाच्या कारखान्यात परप्रांतीयांची भरती झाली. मराठी माणुस देशोधडीला लागला. विलासराव मात्र विकास केला म्हणून स्वतःची पाठ ठोपतून घेत आहेत. सर्वात मोठे काम म्हणजे खुर्चीला चिकटून बसले. अतिशय वाईट कारकीर्द (महाराष्ट्रासाठी -:) )

Anonymous said...

agadi barobbar!